महत्वाच्या बातम्या

 भरधाव वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू


- दवडीपार फाट्यावरील अपघातात सायकलस्वाराचा मृत्यू; मुलाच्या तक्रारीवरून वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील दवडीपार फाटा येथे भरधाव वाहनाने सायकलला धडक दिल्याने ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. रमेश दशरथ ठाकरे ७० वर्षे रा. मुजबी, ता. भंडारा असे मृताचे नाव असून, ही घटना २४ ऑक्टोबर रोजी दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश ठाकरे हे सिलिंडर बुकिंगसाठी आवश्यक असलेला ओटीपी देण्याकरिता भंडारा येथील गॅस एजन्सीत गेले होते. तेथील काम आटोपून ते सायकलने आपल्या मुजबी येथील घरी परतत होते. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील दवडीपार फाटा येथे रस्ता ओलांडत असताना एमएच १२ वायएच ४०८४ क्रमांकाच्या भरधाव वाहनाने त्यांच्या सायकलला धडक दिली. या अपघातात रमेश ठाकरे यांचा मृत्यू झाला. भरधाव वाहनाच्या धडकेत एका ज्येष्ठ नागरिकाला जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेप्रकरणी रमेश ठाकरे यांचे पुत्र निलेश ठाकरे यांनी भंडारा पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ (१) व २८१ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ओकटे करीत आहेत.





  Print






Related Photos