गडचिरोली जिल्ह्यात आज ३ नव्या बाधितांची नोंद तर ६ जण कोरोनामुक्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
आज गडचिरोली जिल्हयात 365 कोरोना तपासण्यांपैकी  3 नवीन कोरोना बाधित   तसेच आज 6 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30746 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29988आहे. तसेच सद्या 12 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 746 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.53 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.04 टक्के तर मृत्यू दर 2.43 टक्के झाला. 
नवीन 03 बाधितामध्ये गडचिरोली 01, आरमोरी 01, सिरोंचा 01 तर आज कोरोनामुक्त झालेल्या  06 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 01,  मुलचेरा तालुक्यातील 05, जणांचा समावेश आहे.




  Print






News - Gadchiroli | Posted : 2021-09-13






Related Photos