१ ऑक्टोबरला मुंबईत भाजपा आदिवासी मोर्चाची संसदीय संकुल विकास परियोजना बैठक

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बैठकीचे निमंत्रण : उपस्थित राहण्याची भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची विनंती
- १ ऑक्टोबरला मुंबईत भाजपा आदिवासी मोर्चाची संसदीय संकुल विकास परियोजना बैठक
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बैठकीचे निमंत्रण; उपस्थित राहण्याची भाजपा आदिवासी मोर्चा
प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची विनंती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : आदिवासी व ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याच्या दृष्टीने भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या वतीने १ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे ‘संसदीय संकुल विकास परियोजना संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस उपस्थित राहण्याचे निमंत्रण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांना भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी दिले असून, बैठकीस उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.
या बैठकीस भाजपा राष्ट्रीय संयोजक व्ही. सतीशजी, शिवकुमारजी, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्रजी चव्हाण, महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईके यांच्यासह भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातील आदिवासीबहुल तसेच दुर्गम भागातील गावांचा संकुल पद्धतीने सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, कौशल्य विकास, उपजीविका, पायाभूत सुविधा, जलसंधारण तसेच शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी लाभ गावागावांत पोहोचविण्यासाठी नियोजन करण्यावर भर दिला जाणार आहे.
संसदीय संकुल विकास परियोजनेचा महाराष्ट्रातील आदिवासी व ग्रामीण भागात विस्तार करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी झालेल्या आढावा बैठकीत विधानसभा क्षेत्रापर्यंत या उपक्रमाचा विस्तार करण्याची भूमिका मांडली आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील गावांचा समूह तयार करून महिलांचे सक्षमीकरण, जलसंधारण, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, युवकांसाठी कौशल्य व बाजारपेठेच्या संधी तसेच शाश्वत उपजीविकेवर भर देण्याबाबत त्यांनी निर्देश दिले होते.
या पार्श्वभूमीवर १ ऑक्टोबरची बैठक महाराष्ट्रातील आदिवासी भागाच्या विकासासाठी पुढील दिशा निश्चित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीस उपस्थित राहून मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी व्यक्त केली आहे.
आदिवासी व ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याच्या दृष्टीने भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या वतीने १ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे संसदीय संकुल विकास परियोजना संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस उपस्थित राहण्याचे निमंत्रण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांना भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी दिले असून, बैठकीस उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.
या बैठकीस भाजपा राष्ट्रीय संयोजक व्ही. सतीशजी, शिवकुमारजी, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार मा. रवींद्रजी चव्हाण, महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईके यांच्यासह भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातील आदिवासीबहुल तसेच दुर्गम भागातील गावांचा संकुल पद्धतीने सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, कौशल्य विकास, उपजीविका, पायाभूत सुविधा, जलसंधारण तसेच शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी लाभ गावागावांत पोहोचविण्यासाठी नियोजन करण्यावर भर दिला जाणार आहे.

Petrol Price