इनर व्हील क्लब ऑफ वरोरा तर्फे मोफत हिमोग्लोबिन, CBC व शुगर तपासणी शिबिर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : इनर व्हील क्लब ऑफ वरोरा, डिस्ट्रिक्ट 303 तर्फे समाजातील नागरिकांसाठी मोफत CBC व शुगर तपासणी व गरजुंना औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर डॉ. साक्षी उपलेंचवार यांच्या सद्गुरू क्लिनिक येथे आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये समाजातील नागरिकांची हिमोग्लोबिन तपासणी, CBC टेस्ट तसेच शुगर टेस्ट करुण गरजुंना औषध वाटप करण्यात आली. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेक नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. शिबिराच्या आयोजनापासून ते तपासणीच्या संपूर्ण व्यवस्थेपर्यंतची सर्व जबाबदारी व नियोजन डॉ. साक्षी उपलेंचवार यांनी सांभाळले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे व सहकार्यामुळे शिबिर यशस्वीपणे पार पडले.
या उपक्रमातून नागरिकांमध्ये नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व आणि आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा सौ. स्नेहल पत्तिवार, उपाध्यक्षा प्रतिभा मनियार,सचिव प्राजक्ता कोहले,तसेच प्रिया टोंगे माधवी शेन्द्रे,नीलिमा गुंडावार,अनु डोंगरवार, दर्शना मोदी,पूजा गोठी,संध्या बारई,पूजा मुंदड़ा,चेतना गोठी या सदस्यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष सहकार्य केले व इतर सर्व सदस्य सुद्धा उपस्थित होते.




Petrol Price




