दहेगावात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : ११ जण ताब्यात, २ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : दहेगाव रंगारी येथील टॉवरजवळील मैदानावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर खापरखेडा पोलिसांनी गुरुवारी २० आगस्ट रात्री धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत जुगार खेळणाऱ्या ११ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, घटनास्थळावरून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण २ लाख ४४ हजार ८५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांना दहेगाव रंगारी येथील टॉवरजवळील मैदानावर जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर खापरखेडा पोलिसांच्या पथकाने गुरुवारी रात्री अचानक संबंधित ठिकाणी धाड टाकली. पोलिसांची कारवाई होताच जुगार खेळणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळावरून ११ जणांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये मोहम्मद असरार छुट्टन सिद्धिकी ३८ वर्षे, धरमदेव जगदीश शाहानी ३०वर्षे , सागर मारोतराव साठे ३० वर्षे, रमेश रामकिशन रविदास ३५ वर्षे आणि विनीत मधुबन सिंग ४०वर्षे, सर्व रा. चनकापूर, ता. सावनेर, तसेच आशिष गणेश राऊत २८ वर्षे, सुभाष बाबुलाल कामठे २३वर्षे, जॉयल सॅम्युअल डेविड १९वर्षे, आशिष विजय शास्त्री २५ वर्षे आणि कृष्णा रामायण राम ३७ वर्षे, सर्व रा. दहेगाव रंगारी, ता. सावनेर आणि स्वप्निल पुंजासाम बोंडे ३० वर्षे, रा. पाटणसावंगी, ता. सावनेर यांचा समावेश आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण २,४४,८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व ११ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस शिपाई राम कापसे, आशिष मेश्राम, शेखर वानखेडे आणि संदीप सगणे यांच्या पथकाने केली. दहेगाव परिसरात सुरू असलेल्या जुगारावर झालेल्या या कारवाईमुळे अवैध जुगार चालविणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. परिसरातील अवैध धंद्यांवर पोलिसांकडून यापुढेही कारवाई सुरू राहण्याची शक्यता आहे.




Petrol Price




