शेतकऱ्यांना शासनाच्या योजनेचा लाभ, व्यापाऱ्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांची फसवणुक करु नये : खासदार अशोक नेते


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : शेतकऱ्यांना खरीप हंगामाचा बोनस म्हणून ज्या शेतकऱ्यांची नोंदणी आदिवासी विकास माहामंडळ अथवा मार्केटींग फेडरेशन यांचेकडे झालेली आहे. मग धान्याची विक्री केली असो वा नसो हेक्टरी १५०००/- (पंधरा हजार रुपये) कमाल दोन हेक्टर पर्यंत रु. ३०,०००/- (तिस हजार) लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात शिंदे-फडणविस सरकार जमा करीत आहे. काही व्यापाऱ्यांनी राज्य शासनाच्या या योजनेची संधी साधून विक्री करीता शेतकऱ्यांच्या ७/१२ ची आदिवासी विकास महामंडळ किंवा मार्केटींग फेडरेशन कडे नोंदणी केली.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या बोनसवर देखील अशा व्यापाऱ्यांनी डल्ला मारणे सुरु केल्याच्या तक्रारी येत आहेत. व्यापाऱ्यांनी ही फसवणूक थांबवावी लाभार्थी शेतकऱ्यांनी हा बोनस त्यांना मुळीच देऊ नये ज्या शेतकऱ्यांनी मिळालेला बोनस व्यापाऱ्यांना दिला आहे तो परत घ्यावा. परत न दिल्यास त्या व्यापाऱ्यांविरुध्द जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करावी असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
News - Gadchiroli