बल्लारपूर बसस्थानकाजवळ विदेशी दारू वाहतुकीचा पर्दाफाश : LCBची धडक कारवाई


- ५.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने धडक कारवाई करत ५ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजता बल्लारपूर बसस्थानक परिसरात नाकाबंदी करून करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला चंद्रपूर - बल्लारपूर - राजुरा मार्गाने विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने बल्लारपूर बसस्थानक परिसरात नाकाबंदी केली. यावेळी संशयास्पदरीत्या येणाऱ्या रेनॉल्ट डस्टर कार क्रं एमएच ४० एसी ९८५५ ची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी दारू आढळून आली.
या कारवाईत नागेश पोचणा पाकूलवार (वय ३८), रा. भेंडवी, ता. राजुरा आणि मुरली वेंकटाद्री पचवा (वय २९), रा. भेंडवी, ता. राजुरा यांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी कारसह सह्याद्री विस्कीच्या ९० मिलीच्या १०० बाटल्या किंमत १० हजार रुपये, रॉयल स्टॅगच्या १८० मिलीच्या ४८ बाटल्या किंमत १२ हजार रुपये तसेच रॉयल स्टॅगच्या ९० मिलीच्या २०० बाटल्या किंमत ३० हजार रुपये असा एकूण ५२ हजार रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त केला. यासोबतच सुमारे ५ लाख रुपये किमतीची रेनॉल्ट डस्टर कार जप्त करण्यात आली. अशाप्रकारे एकूण ५ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
या प्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात अप.क्र. ९१८/२०२६, कलम ६५(अ), ८३ महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक दीपक काँक्रेडवार, सफौ स्वामीदास चालेकर, पोहवा रामराव बिंगेवाड, गणेश भोयर, शरद कुडे, पोअं शेखर माथनकर यांनी केले.




Petrol Price




