राजुरात काँग्रेसची मंडल यात्रा सभा उत्साहात : ओबीसी हक्क, आरक्षण व घटनात्मक अधिकारांच्या संरक्षणासाठी जनजागृतीचा निर्धार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : ओबीसी समाजाला सामाजिक न्याय, आरक्षण आणि घटनात्मक अधिकारांचे संरक्षण मिळावे, तसेच समाजाच्या विविध प्रश्नांवर व्यापक जनजागृती व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या मंडल यात्रे ची सभा राजुरा येथील गडचांदूर रोडवरील स्वयंवर मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या सभेत ओबीसी आरक्षण, सामाजिक न्याय, घटनात्मक अधिकार, राजकीय प्रतिनिधित्व तसेच सामाजिक व आर्थिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. यशपाल भिंगे, विदर्भ समन्वयक मोरेश्वर भादे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष धनराज मुंगले, विनोद अहिरकर, जिल्हाध्यक्ष उमाकांत धांडे, गुरुदास चौधरी, अजय हट्टेवार, प्रशांत पवार, राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक तथा नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, ॲड. अरुणभाऊ धोटे, ॲड. सदानंद लांडे, नंदकिशोर वाढई, महिला जिल्हाध्यक्ष कुंदाताई जेनेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय राजुरा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रंजन लांडे, कोरपना तालुकाध्यक्ष उत्तम पेचे, गोंडपिंपरी तालुकाध्यक्ष अशोक रेचनकर, राजुरा तालुका काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे अध्यक्ष सुरेश पावडे, कोरपना तालुका ओबीसी विभागाचे अध्यक्ष राहुल मालेकर, गोंडपिंपरी तालुका ओबीसी विभागाचे अध्यक्ष महेंद्र कुनघाडकर, जिवती तालुका ओबीसी विभागाचे अध्यक्ष तिरुपती पोले, गडचांदूर नगर परिषदेचे उपाध्यक्ष संजय मेंढी, राजुरा काँग्रेसचे शहराध्यक्ष हरजीतसिंग संधू, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष निर्मला कुडमेथे, शहराध्यक्ष संध्या चांदेकर, नानाजी आदे, नगर परिषद सभापती अनंतकुमार ताजने, पूनम गिरसावळे, नगरसेविका इंदूबाई निकोडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हर एक ओबीसी बनेगा काँग्रेस या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या सभेत ओबीसी समाजाचे हक्क आणि अधिकार याबाबत व्यापक जनजागृती करण्याचा तसेच संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. ओबीसी आरक्षणावर कोणत्याही प्रकारे गदा येऊ नये, सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर संघटितपणे आवाज उठवावा आणि घटनात्मक अधिकारांच्या संरक्षणासाठी व्यापक जनआंदोलन उभारावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
News - Chandrapur




Petrol Price




