महत्वाच्या बातम्या

 जागतिक आदिवासी दिनानिमित्त भाजपतर्फे बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन : बल्लारपुरात भव्य शोभायात्रा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : जागतिक आदिवासी दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे बल्लारपूर येथे आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान व महान स्वातंत्र्यसैनिक भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. यानंतर आदिवासी समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा मार्गदर्शक चंदनसिंह चंदेल यांच्या शुभहस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पूजनानंतर आदिवासी बांधव-भगिनींच्या सहभागाने शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषा आणि सांस्कृतिक उत्साहामुळे शोभायात्रेला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले.

या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी बल्लारपूर शहराध्यक्ष अ‍ॅड. रणंजयसिंह यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच भाजप आदिवासी मोर्चाचे अध्यक्ष रमेश भाऊ तोडसाम यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीने पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी महिला मोर्चाच्या महामंत्री जयश्री मोहोर्ले, भाजप उपाध्यक्ष डॉ. सुरेखा श्रीवास्तव, सुधीर यूथ क्लबचे अध्यक्ष ओमप्रकाश प्रसाद, बूथ प्रमुख बाबाराव मेश्राम, रेखा तोडसाम, भाजप उपाध्यक्ष प्रतिज्ञा शेंडे, शुभांगी जाधव, बेबी केशकर, शिंदे यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व बूथ प्रमुख उपस्थित होते.

भगवान बिरसा मुंडा यांच्या संघर्ष, स्वाभिमान आणि समाजजागृतीच्या विचारांचा संदेश यावेळी देण्यात आला. आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि अस्मिता जपण्याबरोबरच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत आदिवासी समाजातील बांधव-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषा, सांस्कृतिक उत्साह आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.





  Print






News - Chandrapur




Related Photos