महत्वाच्या बातम्या

 आर्वीत जुगार अड्ड्यावर लाठी पोलिसांचा छापा : सात जण ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : गोंडपिंपरी तालुक्यातील आर्वी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर लाठी पोलिसांनी धाड टाकून सात जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, ताशाचे पत्ते व चार मोबाईल असा एकूण २३ हजार २७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी ८ ऑगस्ट दुपारी करण्यात आली.

लाठी पोलिसांना आर्वी येथील शंकर निखाडे यांच्या गोठ्याजवळील मोकळ्या जागेत काही जण ५२ ताशांच्या पत्त्यांवर पैशांची बाजी लावून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीची खात्री करून पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली. यावेळी जुगार खेळताना सात जण आढळून आले.

पोलिसांनी केलेल्या अंगझडतीत २ हजार २२० रुपये रोख, ५० रुपये किमतीचे ५२ ताशाचे पत्ते, २ रुपये किमतीची निळ्या रंगाची पेन तसेच २१ हजार रुपये किमतीचे चार मोबाईल असा एकूण २३ हजार २७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी राहुल अंबादास खोब्रागडे ४० वर्षे रा. तोहगाव, सचिन दामोधर मोरे ३४ वर्षे बाळकीसन खुशाल जेऊरकर ४१ वर्षे प्रकाश महादेव आत्राम ३० वर्षे ताराचंद प्रभाकर अलोणे ५९ वर्षे संतोष मारोती मडावी ४६ वर्षे आणि दशवंत धोंडूजी जीवतोडे ५९ वर्षे सर्व रा. आर्वी, ता. गोंडपिंपरीयांच्याविरुद्ध लाठी पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. ५३/२०२६, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्य मार्गदर्शनाखाली लाठी पोलीस ठाण्याच्या ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक निशा भुते यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार अशोक मंजुळकर, पोलीस अंमलदार चेतन झाडे, विलास जाधव, कुणाल पुसाम व महिला पोलीस अंमलदार अनुराधा काळे यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos