एलसीबीची धडक कारवाई : छत्तीसगडमधून घरफोडीतील आरोपी जेरबंद, ३ लाखांची चोरीची रोकड जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा छडा लावत छत्तीसगड राज्यातून एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चोरीतील ३ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. चंद्रपूर शहरातील बसस्थानक परिसरातील कार्यालयातून ६ लाखांची रोकड चोरी झाल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. आरोपीकडून चोरीतील निम्मी रक्कम हस्तगत करण्यात आली असून उर्वरित रकमेचा शोध सुरू आहे.
त्यांच्या कार्यालयातून अज्ञात चोरट्याने रु. ६ लाखांची रोकड चोरी केल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात अप. क्र. ९५६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३३१ (४) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली. पथकाने तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि विविध पुराव्यांच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत संशयित वलेश कुमार हल्बा उर्फ बुवारिया ३८ वर्ष रा. रेंगाकठेरा, पोस्ट डोंगरगाव, जि. राजनांदगाव (छत्तीसगड) याचा शोध घेत त्याला छत्तीसगडमधून ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने २७ जुलै २०२६ रोजी चंद्रपूर शहरातील बसस्थानक परिसरातील कार्यालयातून ६ लाखांची रोकड चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पंचांसमक्ष आरोपीच्या ताब्यातून चोरीतील ३ लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. उर्वरित रकमेचा शोध सुरू असून आरोपीला पुढील तपासासाठी रामनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि योगेश हिवसे, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकर, पोहवा सतीश आवठारे, पोहवा इम्रान खान, पोहवा लालू यादव, पौहवा संदीप, पौहवा हिरालाल गुप्ता, पोअं. किशोर वाकडे आणि पोअं. शशांक बदामवार यांच्या पथकाने पार पाडली.
News - Chandrapur




Petrol Price




