महत्वाच्या बातम्या

 ०३ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, ०३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे. जिल्हास्तरावर तक्रार अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी संबंधित तक्रार प्रथम तालुका लोकशाही दिनात मांडलेली असणे आवश्यक आहे. 

तहसीलदारांच्या उत्तरावर समाधान न झाल्यास त्याची प्रत, तालुका लोकशाही दिनाचा टोकन क्रमांक आणि विहित नमुन्यातील प्रपत्र १ (ब) अर्ज आवश्यक कागदपत्रांसह लोकशाही दिनाच्या किमान १५ दिवस आधी सादर करावा. तक्रार वैयक्तिक स्वरूपाची असणे आवश्यक असून अन्यथा अर्ज विचारात घेतला जाणार नाही, असे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos