तार चोरीच्या संशयातून वृद्ध शेतकऱ्यास मारहाण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : पवनी तालुक्यातील चन्नेवाडा येथे तार चोरीच्या संशयावरून दोन जणांनी एका वृद्ध शेतकऱ्यास व त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याची घटना २१ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र तुळशीराम खोब्रागडे ६५ वर्ष यांनी आपल्या शेताच्या संरक्षणासाठी तार कंपाउंड केले होते. कंपाउंडनंतर उरलेली तार त्यांनी शेतात ठेवली होती. काही दिवसांनी ती तार दिसून न आल्याने त्यांनी संशयित व्यक्तीकडे याबाबत विचारणा केली. मात्र संबंधित व्यक्तीने तार घेतल्याचे नाकारले.
यानंतर गावातील चौकात बसले असताना दोघा आरोपींनी खोब्रागडे यांच्याशी वाद घालत त्यांना मारहाण केली. त्यानंतर सायंकाळी त्यांच्या घराजवळ जाऊन पुन्हा खोब्रागडे तसेच त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.
News - Bhandara




Petrol Price




