अभाविप चे भ्रमंती ग्रामीण जीवन अनुभूती शिबिर उत्साहात संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, गडचिरोली जिल्हा द्वारा आयोजित भ्रमंती ग्रामीण जीवनाची अनुभूती तीन दिवसीय उन्हाळी शिबिर अरततोंडी (कुरखेडा) येथे उत्साहात पार पडले. शिबिराचे उद्घाटन अभाविप राष्ट्रीय मंत्री कु. पायल किनाके यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी विविध बौद्धिक सत्रांमधून ज्ञान संपादन केले तसेच ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. शिबिरादरम्यान ग्रामीण संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक बांधिलकी यांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले सोबतच जंगल भ्रमंती करण्यात आली.
यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील विविध तालुक्यातील विद्यार्थी विद्यार्थ्यांचे उस्फुर्त सहभाग नोंदवला आणि या भ्रमंती शिबिराला उत्साहात संपन्न केले दुसऱ्या दिवशी समारोप करण्यात आले. समर्थांच्या वेळेस गडचिरोली विभाग संयोजक रोहित श्रीरामवार कुरखेडा भाग संयोजक ओमप्रकाश तरार गडचिरोली नगर विस्तारक सुमित बरांडे उपस्थित होते.
News - Gadchiroli




Petrol Price




