महत्वाच्या बातम्या

 दिल्ली येथील जंतर मंतर विद्यार्थ्यांवरील कारवाईच्या निषेधार्थ घाटंजी बंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / घाटंजी : दिल्लीतील शांततापूर्ण विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलीस कारवाईचा निषेध नोंदवत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घाटंजी बंदची हाक देण्यात आली. बंदला घाटन्जी शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने काही काळ दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. तर विद्यार्थी, महिला, युवक, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आव्हाहनानुसार, छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चास प्रारंभ झाला. घाटन्जी शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. तेथे विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध न्याय्य मागण्यांसंदर्भातील निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

मोर्चाचे नेतृत्व वन्चित बहुजन महासन्घाचे तालुकाध्यक्ष संघपाल कांबळे (घाटन्जी) यांनी केले. यावेळी घाटन्जी शहराध्यक्ष सतीश रामटेके, अशोक करमणकर, शामराव मुनेश्वर, रा. वी. नगराळे, भीमसागर मुरार, प्रेमानंद उमरे, सचिन राठोड, अनिल रामटेके, अजय खोब्रागडे, अनंत भोयर, अनिल जावदे, प्रमोद बनसोड, सुभाष मुनेश्वर, भाविक भगत, संतोष जीवने, सुनील नगराळे, विजय रामटेके, नरेश हुमे, सुनील वेले, उमेश पिलावण, सुरेश बिटोले, पदमा खोब्रागडे, सोनाली बागेश्वर, निशा बागेश्वर, मनस्वी कांबळे, कौसल्या रामटेके, पौर्णिमा वासनिक, माया बागेश्वर, सुषमा घारेकर, महिमा खोब्रागडे, शालिनी रामटेके, ज्योती रामटेके, पूजा सोनटक्के यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Rajy




Related Photos