महत्वाच्या बातम्या

 हरविलेले १२ मोबाईल परत करून कोरपना पोलिसांनी जपला जनतेचा विश्वास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : कोरपना पोलीस स्टेशनने तांत्रिक विश्लेषण आणि CEIR पोर्टलच्या मदतीने हरविलेले १२ मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत देत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे १ लाख १२ हजार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस स्टेशन कोरपना येथे हरविलेल्या मोबाईलसंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींनंतर पोलीस निरीक्षक लता वाढिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई अभिजीत चहारे यांनी तांत्रिक विश्लेषण व CEIR पोर्टलच्या सहाय्याने शोधमोहीम राबविली. या मोहिमेत विविध ठिकाणांहून १२ मोबाईल सुरक्षितरित्या हस्तगत करण्यात आले. 

आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर गुरुवारी २ जून रोजी पोलीस निरीक्षक लता वाढिवे यांच्या हस्ते संबंधित मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले. हरविलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी कोरपना पोलिसांचे आभार मानत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

यावेळी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की, मोबाईल हरविल्यास किंवा चोरीला गेल्यास विलंब न करता जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. तसेच CEIR पोर्टलचा वापर करून मोबाईल ब्लॉक व ट्रॅक करण्यासाठी सहकार्य करावे, त्यामुळे हरविलेले मोबाईल शोधण्यास मोठी मदत होते.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लता वाढिवे यांच्या नेतृत्वात पोलीस शिपाई अभिजीत चहारे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.





  Print






News - Chandrapur




Related Photos