आज पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / नागपूर : जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करीअर सेंटर, नागपूर या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन २४ जुलै रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर येथे करण्यात आले आहे.
सदर रोजगार मेळाव्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील कंपन्यांचा जसे की, समर्थ इलेक्ट्रोकेअर प्रा.लि., प्रोव्हिन्शियल लाइफस्टाइल रिटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, हितेश कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, आर्योदय ऑटोस्टार प्रा. लि., गेल इंडिया लिमिटेड आदी कंपन्यांचा सहभाग राहणार असून त्यामध्ये दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा इत्यादी पात्रताधारक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेवून उमेदवारांची प्राथमिक निवड केली जाणार आहे. याव्दारे जिल्ह्यातील उमेदवारांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत.
तसेच या कार्यालयाअंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत देखील अंतिम वर्षातील मुलांना देखील प्रशिक्षणाच्या (इंटर्नशिप) संधी उपलब्ध होणार आहेत. जास्तीत-जास्त उमेदवारांनी सदर रोजगार मेळाव्यास उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त यांनी केले आहे.
News - Nagpur




Petrol Price




