शेतकऱ्यांसाठी कृषि विषयक विशेष मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न


विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : कृषी विज्ञान केंद्र (KVK), साकोली येथे ICAR DAY च्या निमित्ताने बदलत्या हवामानाचे आव्हान आणि शेती क्षेत्रातील वाढती जोखीम लक्षात घेता शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय कृषी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता. कृषी विज्ञान केंद्र, साकोली व WOTR यांच्या संयुक्त विद्यमाने व डॉ. उषा कृषी विज्ञान केंद्र, साकोली यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला संबंधित अधिकारी मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात महल्ले यांनी केली.
त्यांनी पारंपरिक पद्धतीमध्ये भाताची लावणी करण्यासाठी भरपूर पाणी आणि मजूर लागतात. याला पर्याय थेट भात पेरणी पद्धत (DSR) वापरण्याचे आवाहन केले. के एस अनित्य कृषी हवामान शास्त्रज्ञ यांनी अल निनो यावरती सखोल मार्गदर्शन केले. यानंतर , के डी तायडे, उद्यानविद्या यांनी फळबाग लागवडीतून आर्थिक स्थैर्य कसे मिळू शकते याचे महत्व सांगितले. केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी शाश्वत उत्पन्नासाठी फळबाग लागवडीकडे वळावे, असा सल्ला यावेळी देण्यात आला.
डॉ. पी एस उंबरकर किटकशास्त्र यांनी सध्याच्या बदलत्या हवामानामुळे पिकांवर नवीन किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. व त्यासाठी अतिरिक्त रासायनिक खतांच्या वापरामुळे किडींचा रोगप्रतिकार शक्ती वाढत आहे. योग्य ती सेंद्रिय खतांचा वापर केला तर कमी खर्चात चांगले उत्पादन मिळू शकते असे सांगितले. प्रक्षेत्रावर उपस्थित शेतकऱ्यांची प्रक्षेत्र भेट ही जी एस भगत फार्म मॅनेजर यांनी करून घेतली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्र, सकोलीतिल अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे संचालन. ए डी पायधन तर कार्यक्रमाचे आभार आर पी पवार यांनी केले.
News - Bhandara




Petrol Price




