महत्वाच्या बातम्या

 रोपांची कलम बांधणी व जैविक खत निर्मितीबाबत प्रशिक्षण कार्यशाळा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : सामाजिक वनीकरण विभाग, वर्धा आणि कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा यांच्या संयुक्त विद्यमाने रोपांची कलम बांधणी तसेच जैविक खत निर्मिती व वापराबाबत एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी सुहास बढेकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांनी प्रास्ताविकातून प्रशिक्षणाच्या उद्दिष्टांविषयी माहिती दिली. प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा केंद्रप्रमुख जीवन कातोरे उपस्थित होते. त्यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.

यावेळी कृषी विद्यापीठ केंद्र यवतमाळचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा केंद्रप्रमुख डॉ. दीपक कच्छवे यांनी विविध प्रजातींच्या रोपांची कलम तयार करण्याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. त्यानंतर विषयतज्ज्ञ पीक संरक्षण व कीटकशास्त्र विभागाचे डॉ. निलेश वजिरे यांनी जैविक खत निर्मिती आणि त्याचा प्रभावी वापर याबाबत पॉवर पॉइंट सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. तसेच प्रयोगशाळेतील प्रात्यक्षिकांमधून प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला.

कार्यक्रमाला सहाय्यक वनसंरक्षक अंकिता तेलंग, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. जे. ढोबळे, शीतल डोंगरे, सारिका वैरागडे, जे.बी.लांबाडे, रितेश उमक, एस. डी. एलकेवाड यांच्यासह सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी-कर्मचारी, वनपाल, वनरक्षक, वनमजूर आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विषयतज्ज्ञ विस्तार शिक्षण विभागाच्या डॉ. अंकिता अंगाईतकर यांनी केले.





  Print






News - Wardha




Related Photos