विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या : आठ जणांवर गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : सासरच्या मंडळीकडून हुंड्यासाठी पाच लाखांची मागणी केली असता त्रासाला कंटाळून २१ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना गणेशपूर येथे घडली. रोशनी विनोद मोहिते २१ वर्ष रा. गणेशपूर असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकारणी सुभाष श्रवण जाधव रा. गदाणा, ता. खुलताबाद, जि. संभाजीनगर यांनी सिंदी पोलिसांत तक्रार दिली.
त्यावरून पोलिसांनी पती विनोद मोहिते, अंबादास मोहिते, कुसुम मोहिते, सुनील मोहिते, किशोर मोहिते, निमा मोहिते, अरुणा मोहिते व सुनंदा मोहिते सर्व रा. गणेशपूर ता. सेलू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, आरोपींनी रोशनीच्या माहेरच्याकडून वाहन खरेदीसाठी पाच लाख रुपयांची मागणी केली.
त्यासाठी तिला वारंवार मानसिक व शारीरिक त्रास देत कौटुंबिक छळ केला. या छळाला कंटाळून रोशनीने ११ जुलै रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान गणेशपूर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी सिंदी रेल्वे पोलिसांनी तक्रारीवरून संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविला. विवाहितेची आत्महत्या आहे की, हत्या आहे. या बाजूने सुद्धा पोलिस तपास करत आहेत.
News - Wardha




Petrol Price




