महत्वाच्या बातम्या

 सन्मित्र चौकात गतिरोधक बसविण्याची नागरिकांची मागणी : नगरपरिषदेला निवेदन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : टेकडी विभाग व मौलाना आझाद वॉर्ड परिसरातील सन्मित्र चौक येथे भरधाव वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याने या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांनी नगरपरिषदेकडे केली आहे.

नगरपरिषदेचे  मुख्याधिकारी विशाल वाघ यांना याबाबत निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात सन्मित्र चौकातून जाणारा मुख्य रस्ता शाळा, महाविद्यालय तसेच बाजारपेठेला जोडणारा असल्याने येथे दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांची वर्दळ लक्षात घेता भरधाव वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढला असून, गेल्या आठवड्यात दोन ते तीन किरकोळ अपघात झाल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.

वाहनांचा वेग नियंत्रित करून भविष्यातील अपघात टाळण्यासाठी सन्मित्र चौक येथे तातडीने गतिरोधक उभारण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदन देताना प्रशांत झांबरे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग, जिल्हा चंद्रपूर, सुरज चौबे, नीरज दुबे, मनीष राजभर तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos