गडचिरोली शहरासाठी २३ किमीचा फोर-लेन बायपास रोड प्रस्तावित


- मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार प्रकल्पाला गती; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या उपस्थितीत आढावा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोलीतील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहरातील जड वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या मार्फत २३ किलोमीटर लांबीचा चारपदरी (फोर-लेन) बायपास रोड प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या अंतिम आराखड्याचा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली काल आढावा घेण्यात आला.
बैठकीत अंतिम अलाइनमेंटवर चर्चा करून किरकोळ सुधारणा सुचविण्यात आल्या असून, प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. प्रस्तावित बायपास शहरापासून सुमारे ५ ते ६ किलोमीटर अंतरावर असून भविष्यातील २५ ते ३० वर्षांची वाहतूक लक्षात घेऊन त्याचे नियोजन करण्यात आले आहे.
बैठकीस अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता प्रफुल्ल केळकर, नगरपालिका प्रशासन अधिकारी अर्चना मेंढे व मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर उपस्थित होत
News - Gadchiroli




Petrol Price




