महत्वाच्या बातम्या

 आदिवासी मोर्चाच्या कार्याचा पुस्तकी अहवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर : माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या कार्याचे कौतुक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी मुंबई येथील विधान भवनातील महसूल मंत्री दालनात महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान डॉ. होळी यांनी आदिवासी मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात राज्यभर राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा, संघटनात्मक कार्याचा आणि आदिवासी समाजाच्या हितासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा सविस्तर पुस्तकी अहवाल महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे सुपूर्द केला.

डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी मोर्चाने राज्यभर जनसंपर्क अभियान, संघटन विस्तार, विविध सामाजिक उपक्रम, कार्यकर्त्यांचे सक्षमीकरण तसेच आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि विकासाशी निगडित विविध प्रश्नांसाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. या सर्व कार्याचा आढावा आणि त्याची माहिती पुस्तकी अहवालाच्या माध्यमातून महसूल मंत्र्यांसमोर मांडण्यात आली.

यावेळी अहवालाचे अवलोकन करताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा आदिवासी मोर्चाने केलेल्या संघटनात्मक आणि समाजाभिमुख कार्याचे मनापासून कौतुक केले. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, शासनाच्या योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच संघटन अधिक बळकट करण्यासाठी डॉ. होळी यांनी घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.

यापुढील काळातही समाजहिताला प्राधान्य देत अशाच समर्पित भावनेने कार्य सुरू ठेवावे, अशा शुभेच्छाही महसूल मंत्री बावनकुळे यांनी डॉ. होळी यांना दिल्या. आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर शासन सकारात्मक भूमिका घेईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, माजी पंचायत समिती उपसभापती विलास दशमुखे, नीरज पटेल तसेच भारतीय जनता पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी मोर्चाने केलेल्या कार्याचे कौतुक करत आगामी काळातही समाजहिताच्या विविध उपक्रमांना अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.





  Print






News - Rajy




Related Photos