महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


६ जुलै महत्वाच्या घटना

१७३५ : मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे राजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास परतले.

१७८५ : डॉलर हे अमेरिकेचे अधिकृत चलन बनले.

१८८५ : लुई पाश्चर यांनी रेबीज या रोगावरील लसीची यशस्वी चाचणी केली.

१८९२ : ब्रिटिश संसदेत पहिले भारतीय दादाभाई नौरोजी यांची निवड झाली.

१९०८ : रॉबर्ट पियरी यांची उत्तर ध्रुवावर जाण्यासाठीची मोहीम निघाली.

१९१० : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची पुणे येथे स्थापना.

१९३९ : जर्मनीतील ज्यू व्यक्तींचे उरले सुरले उद्योगधंदे बंद करण्यात आले.

१९४७ : रशियात एके-४७ या बंदुकांच्या उत्पादनास सुरुवात झाली.

१९८२ : पुणे – मुंबई मार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यान रेल्वेचा भारतातील सर्वात जास्त लांबीचा (त्याकाळातील) वाहतुकीस खुला झाला.

२००६ : चीनयुद्धापासून बंद असलेली भारत तिबेट जोडणारी नाथूला ही खिंड ४४ वर्षांनंतर व्यापारासाठी खुली झाली.

६ जुलै जन्म

१७८१ : सिंगापूरचे संस्थापक व ब्रिटिश मुत्सद्दी सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स यांचा जन्म. (मृत्यू: ५ जुलै १८२६)

१८३७ : प्राच्यविद्या संशोधक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑगस्ट १९२५)

१८६२ : मानववंशशास्रज्ञ एल. के. अनंतकृष्ण अय्यर यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९३७)

१८८१ : विदर्भातील संत गुलाबराव महाराज यांचा जन्म. (मृत्यू: २० सप्टेंबर १९१५)

१८९० : भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान धन गोपाळ मुखर्जी जन्म. (मृत्यू: १४ जुलै १९३६)

१९०१ : केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुकर्जी यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १९५३)

१९०५ : राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका लक्ष्मीबाई केळकर यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९७८)

१९१४ : डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) चे संस्थापक विन्स मॅकमोहन सिनियर यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे १९८४)

१९२० : अर्थतज्ञ डॉ. विनायक महादेव तथा वि. म. दांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९९५)

१९२७ : लेखक, चित्रकार, पटकथाकार आणि शिकारी व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑगस्ट २००१)

१९३० : दाक्षिणात्य संगीताचे गायक पद्मश्री आणि पद्मविभूषण डॉ. एम. बालमुरलीकृष्णन यांचा जन्म.

१९३५ : चौदावे अवतार दलाई लामा यांचा जन्म.

१९३९ : भारतीय क्रिकेट खेळाडू मनसूद यांचा जन्म.

१९४६ : अमेरिकेचे ४३वे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांचा जन्म.

१९४६ : अभिनेता सिल्व्हेस्टर स्टॅलोन यांचा जन्म.

१९५२ : मराठी साहित्यिक रेखा शिवकुमार बैजल यांचा जन्म.

१९६१ : भारतीय राजकारणी आणि वकील वंदना चव्हाण यांचा जन्म.

१९७५ : अमेरिकन रॅपर, निर्माते आणि अभिनेते ५० सेंट यांचा जन्म.

१९८६ : तम्ब्लर चे संस्थापक डेव्हिड कार्प यांचा जन्म.

१९५५ : इजिप्शियन राजकारणी, पंतप्रधान शेरीफ इस्माईल यांचा जन्म (मृत्यू : ७ जून २०१८)

१९३६ : भारतीय रोमन कॅथोलिक प्रीलेट, बरेलीचे बिशप अँथनी फर्नांडिस यांचा जन्म (मृत्यू : ३ फेब्रुवारी २०२३)

१९३३ : भारतीय लष्करचे जनरल लेफ्टनंट हनुतसिंग राठोड यांचा जन्म (मृत्यू : ११ एप्रिल २०१५)

१९०३ : स्वीडिश बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार यांचा जन्म (मृत्यू : १५ ऑगस्ट १९८२)

१३८७ : नवरे आणि सिसिलीची राणी ब्लँचे आय यांचा जन्म (मृत्यू : १ एप्रिल १४४१)

६ जुलै मृत्यू

१८५४ : जर्मन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज ओहम यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १७८९)

१९८६ : स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, केंद्रीय मंत्री आणि उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १९०८)

१९९७ : हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक चेतन आनंद यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १९२१)

१९९९ : कसोटी क्रिकेटपटू एम. एल. जयसिंहा यांचे निधन. (जन्म: ३ मार्च १९३९)

२००२ : भारतीय उद्योगपती धीरुभाई अंबानी यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९३२)

२००४ : ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष थॉमस क्लेस्टिल यांचे निधन.

१८६९ : ब्यूएना विस्टा वाइनरीचे संस्थापक अगोगोस्टन हरॅस्थी यांचे निधन (जन्म: ३० ऑगस्ट १८१२)





  Print






News - todayspecialdays




Related Photos