महत्वाच्या बातम्या

 भारतीय तरुणांसाठी जर्मनीमध्ये कायमस्वरूपी रोजगाराची आणि उच्च शिक्षणाची सुवर्णसंधी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : भारतातील होतकरू आणि कुशल तरुणांना जागतिक व्यासपीठावर मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी मॅजिक बिलियन ही सरकारमान्य आंतरराष्ट्रीय टॅलेंट मोबिलिटी संस्था अग्रगण्य भूमिका बजावत आहे. सध्या या संस्थेमार्फत जर्मनीमध्ये विविध तांत्रिक आणि सेवा क्षेत्रांत आपले करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने नर्सिंग, फूड प्रोसेसिंग, लॉजिस्टिक्स, प्लंबिंग, मेकॅट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि HVAC (एअर कंडिशनिंग) यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे.

या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांना थेट नोकरी न देता, प्रथम तीन वर्षांचे उच्च दर्जाचे सवेतन व्यावसायिक प्रशिक्षण (ज्याला जर्मनीमध्ये ऑसबिल्डुंग म्हटले जाते) दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना जर्मनीमध्येच कायमस्वरूपी नोकरीची खात्री दिली जाते, ज्यामुळे त्यांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होते.

या संधीचा लाभ घेण्यासाठी पात्रतेचे काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. अर्जदार उमेदवाराचे १८ ते २८ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असून यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवारांना समान संधी उपलब्ध आहे. शैक्षणिक पात्रतेचा विचार करता, नर्सिंग क्षेत्रासाठी एएनएम (ANM) पदवी अनिवार्य आहे, तर मेकॅट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि प्लंबिंग यांसारख्या तांत्रिक क्षेत्रांसाठी १२ वी (गणित विषयासह उत्तीर्ण) किंवा १० वी नंतर दोन वर्षांचा आयटीआय (ITI) कोर्स पूर्ण असणे गरजेचे आहे.

इतर क्षेत्रांसाठी किमान १२ वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे भाषेचे ज्ञान; जर्मनीमध्ये काम करण्यासाठी उमेदवाराला जर्मन भाषेचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक असून, त्यासाठी गोएथे (Goethe) संस्थेचे B१ स्तरावरील प्रमाणपत्र असणे अनिवार्य करण्यात आले आहे.

आर्थिक लाभांच्या दृष्टीने ही संधी अत्यंत आकर्षक आहे. तीन वर्षांच्या प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा विद्यावेतन दिले जाते, ज्यामध्ये पहिल्या वर्षी १,०४८ युरो, दुसऱ्या वर्षी १,१०० युरो आणि तिसऱ्या वर्षी १,१५० युरो इतकी रक्कम मिळते. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम प्रति महिना सुमारे ९४,००० ते १ लाख 3 हजार रुपयांच्या घरात जाते. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, जेव्हा उमेदवार पूर्णवेळ कामावर रुजू होतो, तेव्हा त्याला दरमहा २, २०० ते २,५०० युरो (सुमारे २ ते २.२५ लाख रुपये) इतका सुरुवातीचा पगार मिळतो. याशिवाय, संस्थेमार्फत उमेदवारांना विमानाचे तिकीट विनामूल्य दिले जाते आणि जर्मनीतील वास्तव्यासाठी सवलतीच्या दरात निवासाची सोयही उपलब्ध करून दिली जाते. जे तरुण आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करू इच्छितात, त्यांच्यासाठी ही एक अभूतपूर्व संधी आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos