महत्वाच्या बातम्या

 कारवाफा आश्रमशाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा


- नवागतांच्या पहिल्या पावलांचे उमटले  ठसे : प्रभात फेरी व पाठ्यपुस्तकांचे वितरण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत कारवाफा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत मंगळवार, ३० जून रोजी प्रवेशोत्सव व पालक मेळावा उत्साहात पार पडला. इयत्ता पहिलीत प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळेतील पहिल्या पावलांचे ठसे घेण्यात आले. बँड पथकाच्या साहाय्याने प्रभात फेरीत शैक्षणिक जनजागृती करण्यात आली.पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन नियोजन अधिकारी प्रफुल पोरेड्डीवार यांच्या हस्त झाले. अध्यक्षस्थानी शाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक विष्णू चव्हाण होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल सिडाम, प्रकाश नरोटे, चंदू नरोटे, धनीराम कुमरे, रामजी पुडो, सुनीता पदा, लर्निंग फाउंडेशनचे तज्ञ मार्गदर्शक राकेश लोणारकर, मिलिंद भैसारे, बाबुराव उसेंडी, महेश जिल्लेवार, दिलीप खोब्रागडे, लखन पेंडलवार आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी शाळेत आनंददायी व उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले होते.नव्याने प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांसह सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे गुलाब पुष्पाने स्वागत करण्यात आले. पहिल्या दिवशी इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी तनुजा पदा, सारिका हिचामी, श्रुती उसेंडी यांचे शाळेतील पहिले पाऊल कुंकवाच्या ठशांनी उमटवून जतन करण्यात आले. बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थिनी समीक्षा उसेंडी, ममिता मडावी, सोनाली पावे  तसेच दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थिनी सुरेखा कुमोटी, श्रुती उसेंडी, करीना आतला यांचा सत्कार करण्यात आला. शालेय परिसराची आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होते.कार्यक्रमानंतर मिष्टान सहभोजनाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन संजय धंदर तर आभार प्रदर्शन विवेक नैताम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे, सी.डी.नळे, एम.ई.ठाकूर, टी. ए. आस्कर, व्ही.एस.देसू, चंदा वानखेडे, वर्षा मस्के, चंदा कोरचा, रविकांत पिपरे, कविता बारसागडे, बालाजी पंडागळे, इंदरशाहा कुमरे, अधीक्षक भारत कोरडे, अधीक्षिका उज्वला साव, विनोद जाधव, स्वप्निल राठोड, अभय कांबळे, करिष्मा गोवर्धन, पवन मेश्राम,शिवाणी शेट्टीवार, संगीता करंगामी आदींसह कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos