आरमोरी-देसाईगंज मार्गावर अपघात : शेतात जाणाऱ्या दाम्पत्याला ट्रीपलसीट दुचाकीची धडक, दोघे जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / आरमोरी : शेतात जाण्यासाठी दुचाकीने निघालेल्या पती-पत्नीच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या एका ट्रीपलसीट दुचाकीने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून, ही घटना २१ जून रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आरमोरी-देसाईगंज मार्गावरील इटियाडोह नहराजवळ घडली. रंजना कांबळे व सुरेश कांबळे (रा. आरमोरी) अशी जखमी झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत.
ट्रीपलसीट दुचाकी चालकावर गुन्हा दाखल -
या प्रकरणी निष्काळजीपणे व अविचाराने वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याबद्दल ट्रीपलसीट असलेल्या दुचाकी (क्रमांक एमएच ३३ एजी ५६५४) च्या चालकाविरुद्ध आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नेमकी घटना काय? -
मिळालेल्या माहितीनुसार, आरमोरी येथील रहिवासी असलेले कांबळे दाम्पत्य २१ जून रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आपल्या दुचाकीने (क्रमांक एमएच ३३ पी ६३९१) शेताकडे जाण्यासाठी निघाले होते. ते देसाईगंज मार्गावरील इटियाडोह नहराजवळ पोहोचले असता, मागून येणाऱ्या ट्रीपलसीट दुचाकीने (क्रमांक एमएच ३३ एजी ५६५४) त्यांच्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली.
या धडकेमुळे कांबळे दाम्पत्य दुचाकीवरून रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी आरमोरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
News - Gadchiroli




Petrol Price




