महत्वाच्या बातम्या

 हिंगणाळा शिवारात जुगार अड्ड्यावर चंद्रपूर शहर पोलिसांचा छापा : १० जणांविरुद्ध गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहर पोलिसांनी हिंगणाळा शिवारातील सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धडक कारवाई करत १० जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम व पत्त्यांचा संच असा एकूण ₹४,०५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस हवालदार संतोष दंडेवार यांना गुप्त माहिती मिळाली होती की, हिंगणाळा शिवारातील सार्वजनिक जागेत काही व्यक्ती ५२ पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजितचा जुगार खेळत आहेत. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी सापळा रचत घटनास्थळी छापा टाकला.

कारवाईदरम्यान महेश द्वारकाप्रसाद जोशी (रा. मिलन चौक), वसीम फिरोज खान (रा. दादमहल वार्ड), शिवमंगल गयाप्रसाद सोनकर (रा. महाकाली कॉलरी), पवन बाबुलाल साय (रा. महाकाली कॉलरी), राजेश अशोक साहू (रा. महाकाली कॉलरी), लक्की मधुकर दानव (रा. पठाणपुरा वार्ड), गजानन उत्तम गेठे (रा. कोतवाली वार्ड), किसन मनोज साहू (रा. महाकाली कॉलरी), प्रविण बाबूराव रत्नपारखी (रा. गंज वार्ड) आणि सुरज विलास रासेकर (रा. वडगाव जुनी वस्ती, सर्व रा. चंद्रपूर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम व जुगारासाठी वापरण्यात येणारे पत्ते जप्त करण्यात आले.

आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चौघुले यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार निशिकांत रामटेके यांचा नेतृत्वात पोलीस हवालदार संतोष दंडेवार, पोलीस अंमलदार निलेश ढोक, विक्रम मेश्राम तसेच होमगार्ड सैनिक यांनी केले. पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos