माजी सभापती, जिल्हा परिषद चंद्रपूर स्व. दौलतराव महाराज यांच्या चौदावी कार्यक्रमास आ. डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांची उपस्थिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : अडपल्ली येथे माजी सभापती, जिल्हा परिषद चंद्रपूर स्व. दौलतराव महाराज यांच्या चौदावी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी उपस्थित राहून स्व. दौलतराव महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी त्यांनी स्व. दौलतराव महाराज यांनी सामाजिक, राजकीय व जनहिताच्या कार्यातून समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच उपस्थित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांनी सांत्वन व्यक्त केले. कार्यक्रमास परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Gadchiroli




Petrol Price




