महत्वाच्या बातम्या

 चामोर्शी : वाघदरा जंगलात सुरू असलेल्या जुगार अडड्यावर पोलिसांचा छापा : १.३३ लाखांच्या मुद्देमालासह एक ताब्यात, पाच जण फरार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील वाघदरा येथील जंगलात राजरोसपणे सुरू असलेल्या जुगार अडड्यावर पोलिसांनी १८ जून रोजी धाडसी छापा टाकून मोठी कारवाई केली असून या कारवाईत दोन दुचाकी व रोख रकमेसह एकूण १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

पोलीस अंमलदार शशिकर चिडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी नयन खोब्राग या जुगाऱ्याला जागीच रंगेहाथ ताब्यात घेतले आहे, तर पोलिसांची चाहूल लागताच यश धारणे, ध्रुव सादुलवार, विशाल रायपुरे, उत्कर्ष सहारे आणि आकाश बच्छाड (सर्व रा. चामोर्शी) हे पाच जण जंगलाचा व झाडीझुडपांचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. 

वाघदरा जंगलात काही इसम एकत्र येऊन पैशांची पैज लावून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती, ज्यावरून पोलीस पथकाने जंगलात वेढा देऊन अचानक छापा टाकला असता जुगाराच्या अडड्यावर एकच धावपळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन दुचाकी, रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ३३ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला असून पळून गेलेल्या पाचही फरार आरोपींचा शोध चामोर्शी पोलीस घेत आहेत.





  Print






News - Gadchiroli




Related Photos