मुल आयटीआय येथे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : औद्योगिक क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची वाढती गरज लक्षात घेता युवक-युवतींनी रोजगाराभिमुख शिक्षणाचा लाभ घ्यावा आणि शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ करिता सा. कन्नमवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुल येथे प्रवेश घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य जे. व्ही. निंबार्ते यांनी केले आहे.
सा. कन्नमवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुल येथे ईलेक्ट्रॉनिक मेकॅनिक २४ जागा, मेकॅनिक ईलेक्ट्रीक व्हेईकल २४ जागा, फिटर-२० जागा, मेकॅनिक मोटर व्हेईकल २४ जागा, वायरमन २० जागा, मेकॅनिक डिझेल-२४ जागा, वेल्डर-४० जागा, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक २० जागा, फॅशन डिझाईन अॅन्ड टेक्नॉलॉजी-२० जागा असे विविध व्यवसायचे अभ्यासक्रम उपलब्ध असून विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक प्रशिक्षण, अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन तसेच रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या जातात.
यावर्षी प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली असून १० उत्तीर्ण तसेच पात्र विद्यार्थ्यांनी २१ जून २०२६ पर्यंत अर्ज सादर करून प्रवेशाची संधी साधावी. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आयटीआयचे शिक्षण हे अल्प खर्चात रोजगार व स्वयंरोजगाराच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थी व पालकांनी सा. कन्नमवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुल येथे संपर्क साधावा, असे आवाहनही प्राचार्य जे. व्ही. निंबार्ते यांनी केले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




