अमेय सावकार पोरेड्डीवार यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली शहराचे पहिले नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार यांचे सुपुत्र अमेय सुरेश सावकार पोरेड्डीवार (वय ३७) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराची वेळ निश्चित करण्यात आली आहे.
कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमेय सावकार पोरेड्डीवार यांच्यावर उद्या सकाळी १०.३० वाजता गडचिरोली येथील कठाणी नदीवरील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यापूर्वी त्यांच्या निवासस्थान असलेल्या सावकार वाड्यातून सकाळी १० वाजता अंतिमयात्रा निघणार आहे.
अमेय सावकार यांच्या अकाली निधनामुळे गडचिरोली शहरात हळहळ व्यक्त होत असून विविध सामाजिक, राजकीय, व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आणि अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या निधनाने सावकार पोरेड्डीवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण शहर शोकमग्न झाले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




