राजुरा पोलिसांची कारवाई : दुचाकी व ट्रॅक्टर बॅटरी चोरीचे दोन गुन्हे उघड, दोन आरोपी जेरबंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : राजुरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने चोरीच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांचा यशस्वी छडा लावत दोन आरोपींना अटक केली असून चोरीस गेलेली दुचाकी आणि ट्रॅक्टरची बॅटरी जप्त केली आहे. साहील राजू संटी (वय २३), रा. सुभाष वॉर्ड, बल्लारपुर व रविंद्र बिरेंद्र सिंग (वय २६), रा. आर्वी, ता. राजुरा असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, ५ जून २०२६ रोजी खुशी परमेश गादमल्लू (वय २३), रा. बामणी, ता. बल्लारपुर यांनी राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ३ जून रोजी रात्री धोपटाळा वस्ती परिसरातून त्यांच्या भावाची एमएच-३० सीडी-०३२२ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची जुनी ज्युपिटर स्कुटी अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. याप्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५२४/२०२६ अंतर्गत कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तसेच १२ जून २०२६ रोजी संतोष बापुजी विधाते (वय ५२), रा. अमराई बाई, राजुरा यांनी आर्वी येथील विटाभट्टीवर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरमधील एसएफ कंपनीची बॅटरी चोरीस गेल्याची तक्रार दिली होती. याप्रकरणी गुन्हा क्रमांक ५४४/२०२६ अंतर्गत कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दोन्ही गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला.
तपासादरम्यान स्कुटी चोरी प्रकरणातील आरोपी साहील राजू संटी (वय २३), रा. सुभाष वॉर्ड, बल्लारपुर याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्याच्याकडून सुमारे ४० हजार रुपये किमतीची चोरीस गेलेली ज्युपिटर स्कुटी जप्त करण्यात आली.
तर ट्रॅक्टर बॅटरी चोरी प्रकरणात रविंद्र बिरेंद्र सिंग (२६), रा. आर्वी, ता. राजुरा याला अटक करून त्याच्याकडून सुमारे ७,५०० रुपये किमतीची एसएफ कंपनीची बॅटरी जप्त करण्यात आली.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे, सफौ. किशोर तुमराम, पोहवा अनुप डांगे, विक्की निर्वाण, पोअं महेश बोलगोडवार, शफीक शेख, मिलिंद जांभुळे, रमेश बस्सी, राजीव दुबे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
News - Chandrapur




Petrol Price




