पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक कार्यकाळानिमित्त श्रीक्षेत्र से माना येथे विशेष पूजा-अर्चना व महाआरती


- आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा सांभाळत सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान होण्याचा ऐतिहासिक गौरव प्राप्त केला आहे. या अभूतपूर्व यशानिमित्त गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या नेतृत्वाखाली श्रीक्षेत्र से माना देवस्थान येथे विशेष पूजा-अर्चना व महाआरतीचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल भवितव्य लाभावे, तसेच त्यांच्या खंबीर नेतृत्वाखाली भारताने प्रगतीची नवी शिखरे गाठावीत, अशी प्रार्थना शेमाना माऊलीच्या चरणी करण्यात आली. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनकल्याणासाठी सामूहिक मंगलकामनाही करण्यात आल्या.
आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. यावेळी आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, गडचिरोली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अॅड. प्रणोती निंबोरकर, माजी पंचायत समिती सभापती विलासजी दसमुखे, भाजपा शहराध्यक्ष तथा बांधकाम सभापती अनिलजी कुनघाडकर, नगरपरिषद उपाध्यक्ष निखिलजी चरडे, शिक्षण सभापती हर्षदजी गेडाम यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधल्याचा उल्लेख करत, विकसित भारताच्या संकल्पनेला अधिक बळ मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला असून, उपस्थितांनी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निरोगी व दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली.
News - Gadchiroli




Petrol Price




