बूथ पालकांनी बूथ निहाय बैठकीचे आयोजन करून बूथ मजबुतीकरण करावे : जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांचे बूथ पालकांना आवाहन
- भाजपा धानोरा तालुका बूथ पालक बैठक संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : भाजपा धानोरा तालुका व शहराच्या वतीने आयोजित बूथ पालक बैठक भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे अध्यक्षतेखाली राधेश्याम बाबा मंदिर परिसरात पार पडली.
या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत साळवे, साईनाथ साळवे, धानोरा तालुका अध्यक्षा लता पुंघाटी, शहरध्यक्ष सारंग साळवे, तालुका महामंत्री विजय कुंभरे, गोपाल उईके, दिलीप बरसिंगे, अनुसया कोरेटी, अजमन राऊत, प्रवीण मडावी, धर्मराज रस्से, जगदीश साहारे, मिलिंद मसराम, रामदास गावंडे व बूथ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी बूथ पालक (सुपर वॉरियर्स) यांच्या सोबत संवाद साधले सविस्तर चर्चा केले व त्यांना मार्गदर्शन करताना त्यांचे महत्व पटऊन दिले. भारतीय जनता पार्टीचा संकल्प महाविजय २०२४ असून या संकल्पनाची पुस्तिका प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थिती मध्ये सर्व बूथ पालकांना मिळालेली आहे.
त्या पुस्तिका द्वारे ३ बूथ माघे एक बूथ पालक (सुपर वॉरियर्स) ची नेमणूक करण्यात आलेली आहे. सर्व बूथ पालकांनी प्रत्येक बुथावर महाविजय २०२४ या पुस्तिका मध्ये दिलेले कार्यक्रम बुथांवर आयोजित करून त्या पुस्तिका द्वारे सर्व बूथ पालकांनी बूथ सक्षमीकरण करून बूथ मजबूत करावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी बूथ पालकांना केले.
News - Gadchiroli