शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प : रोहित अग्रवाल

- गोरेगाव तालुक्यात भारतीय जनता युवा मोर्चाची नवी कार्यकारिणी जाहीर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / गोरेगाव : भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) गोरेगाव तालुक्याची नवी कार्यकारिणी भाजयुमो जिल्हाध्यक्ष रोहित अग्रवाल यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली नुकतीच जाहीर करण्यात आली. नव्या कार्यकारिणीअंतर्गत तालुकाध्यक्ष रविंद्र (रवि) पटले यांच्या नेतृत्वाखाली युवा कार्यकर्त्यांना विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. संघटन विस्तार, सामाजिक कार्य, जनसंपर्क तसेच पक्षाच्या विचारसरणीचा प्रभावी प्रचार-प्रसार या उद्देशाने या नव्या कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली आहे.
जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीनुसार, भाजयुमो गोरेगाव मंडळाच्या सरचिटणीसपदी किरण पालेवार, अजय राहंगडाले आणि खोमेंद्र पारधी यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी उपस्थित वरिष्ठ पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमादरम्यान युवा नेतृत्वाने संकल्प व्यक्त केला की, युवा शक्तीच्या बळावर गोरेगाव तालुक्यात संघटना अधिक बळकट करण्यात येईल तसेच केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविला जाईल.
तसेच सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटना मजबूत करणे, बूथ सक्षमीकरण, सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग, पर्यावरण संवर्धन, युवकांचा सहभाग वाढविणे आणि आगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय सुनिश्चित करण्यासाठी समर्पित भावनेने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
या बैठकीला माजी आमदार हेमंत पटले, डॉ. लक्ष्मण भगत (बांधकाम सभापती), चित्रकला चौधरी (पंचायत समिती सभापती), जिल्हा सरचिटणीस मनोज बोपचे, पुष्पराज जनबंधू, अभय मानकर, विक्की बघेले, अजीत टेंभरे यांच्यासह भाजपा व भाजयुमोचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Gadchiroli




Petrol Price




