विकसित भारत संकल्प संमेलन व आमदार विशेष जनसंपर्क अभियाना अंतर्गत शीख समाज बांधवांशी संवाद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : विकसित भारत संकल्प संमेलन तसेच आमदार विशेष जनसंपर्क अभियान अंतर्गत गोकुळनगर येथील शीख समाज मंदिर संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी पटवा यांच्या निवासस्थानी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी सदिच्छा भेट दिली.
या भेटीदरम्यान सुनीलजी पटवा व त्यांच्या परिवारासह शीख समाजातील बांधवांनी आमदार डॉ. नरोटे यांचे अत्यंत आत्मीयतेने स्वागत केले. यावेळी शीख समाजाच्या विविध समस्या, स्थानिक अडीअडचणी, सामाजिक विकासाशी निगडित विषय तसेच समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसंदर्भात सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली.
समाजातील प्रत्येक घटकाच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी कटिबद्ध राहणे आणि सर्व समाजघटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेणे हीच आपली प्राथमिकता असल्याचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी यावेळी स्पष्ट केले.
या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष तथा बांधकाम सभापती अनिलजी कुनघाडकर, नगरपरिषद उपाध्यक्ष निखिलजी चरडे, नगरसेविका साक्षी बोलूवार, घनश्यामजी वाढई, भाजयुमो शहराध्यक्ष साईजी सिलामवर, बूथ प्रमुख सागरजी सोनटक्के, दोमाजी कुंभारे, पुंढालिकजी सांगिडवार, दिलीपजी पटवा, आकाशजी बोलुवार, आशिषजी सातपुते, तेजसजी लाकडे, पिंटूजी पुरावार, चेतनजी बोलुवार आदी मान्यवर उपस्थित होते.
News - Gadchiroli




Petrol Price




