महत्वाच्या बातम्या

 पंडित दिनदयाल उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह रद्द


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : Security and Intelligence Services ( India ) Limited Gondiya , जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली व मॉडेल करिअर सेंटर, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने ०८ जून २०२६ ते १२ जून २०२६ या कालावधीत वेळ स.१०.३० ते दू.४.३० वाजेपर्यंत रोजगार भरती मेळावा आयोजित करण्यात आलेले होते.

सदर भरती मेळावा कोरची, कुरखेडा, वडसा, आरमोरी व गडचिरोली या सर्व तालुक्यातील पंचायत समिती सभागृह, पंचायत समिती कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आले होते. परंतू प्रशासकीय कारणास्तव ०८ जून २०२६ ते १२ जून २०२६ रोजीचे भरती रोजगार मेळावा रद्द करण्यात आली आहे. 

तसेच उक्त दिनांकाची भरती रोजगार मेळाव्यांचे पुढील नियोजित तारखा लवकरच कळविण्यांत येईल. याची सर्व बेरोजगार उमेदवारांनी नोंद घ्यावी. असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos