महत्वाच्या बातम्या

 रत्नापुर येथे वाढदिवसानिमित्त शिव मंदिराला स्पीकर मशीनची भेट


- वाढदिवसाला अनावश्यक खर्च न करता समाजोपयोगी केले कार्य

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील  रत्नापूर येथील युवा समाजसेवक सिद्धांत राजू रंदये यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवत गावातील शिव मंदिराला स्पीकर मशीन भेट दिली. या उपक्रमामुळे मंदिरातील धार्मिक कार्यक्रम, भजन-कीर्तन तसेच विविध आध्यात्मिक उपक्रम अधिक प्रभावीपणे पार पाडता येणार आहेत.

यावेळी मंदिर परिसरात ग्रामस्थ व भाविकांच्या उपस्थितीत स्पीकर मशीन मंदिर समितीकडे सुपूर्द मंगळवार २ जून २६ रोजी करण्यात आले. वाढदिवस साजरा करताना अनावश्यक खर्च न करता समाजोपयोगी कार्य करण्याचा संदेश सिद्धांत रंदये यांनी दिला.

ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. मंदिर समितीच्या वतीने सिद्धांत रंदये यांचा सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले.

सामाजिक जाणीव जपत वाढदिवसानिमित्त केलेल्या या उपक्रमामुळे परिसरात त्यांचे अभिनंदन होत असून युवकांसाठी त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos