आजचे दिनविशेष


३ जून महत्वाच्या घटना
१८१८ : मराठेशाहीचा अस्त – शेवटचे पेशवे बाजीराव हे मध्यप्रदेशातील असीरगढजवळ ढोलकोट येथे जनरल माल्कम याच्या स्वाधीन झाले आणि त्यांनी मराठी राज्य इंग्रजांच्या कडे सोपवले . नंतर इंग्रजानी शनिवार वाड्या वर कब्जा केला आणि तिथे युनियन जॅक फडकला
१८८९ : ट्रान्ससिटोनेंटल कॅनेडियन पॅसिफिक रेल्वेचे काम पूर्ण झाले.
१९१६ : महर्षी कर्वें यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली.
१९४० : डंकर्कची लढाई – जर्मनीचा विजय. दोस्त सैन्याने पळ काढला.
१९४० : दुसरे महायुद्ध – जर्मन वायूदलाने पॅरिसवर बॉम्बवर्षाव केला.
१९४७ : हिन्दूस्तानच्या फाळणीची मांउंटबॅटन योजना जाहीर झाली.
१९५० : मॉरिस हेर्झॉग आणि लुईस लॅचेनल यांनी अन्नपूर्णा या ८,०९१ मीटर उंच असलेल्या शिखरावर प्रथमच यशस्वी चढाई केली.
१९७९ : मेक्सिकोच्याअखातात इहटॉक या खनिज तेलाच्या विहिरीला आग लागली. ६,००,००० टन तेल समुद्रात पसरले.
१९८४ : ऑपरेशन ब्ल्यू स्टार – भारतीय सैन्याने आत घुसलेल्या अतिरक्यांना हुसकावण्यासाठी अमृतसरच्या सुवर्णमंदिरावर हल्ला चढवला.
१९८९ : थ्येनआनमन चौकात सात आठवडे तळ ठोकलेल्या प्रदर्शकांना घालवण्यासाठी चीनने लष्कर पाठवले.
१९९८ : जमिनीवरील हवेतील लक्ष्यावर मारा करणाऱया त्रिशूल क्षेपणास्त्राची द्रोणाचार्य या युद्धनौकेवरून कोचीजवळ यशस्वी चाचणी झाली.
२०१९ : खार्तूम हत्याकांड - सुदानमध्ये सुरक्षा दल आणि जंजावीद मिलिशिया यांनी आंदोलन करणाऱ्या लोकांवर गोळीबार केला त्यात किमान १०० लोंकांचे निधन.
२०१७ : लंडन ब्रिज हल्ला - इस्लामिक दहशतवाद्यांनी आठ लोकांची हत्या केली.
२०१५ : घाना मधील आक्रा येथील पेट्रोल स्टेशनवर झालेल्या स्फोटात किमान २०० लोकांचे निधन.
२०१३ : चीनमधील जिलिन प्रांतातील पोल्ट्री फार्मला लागलेल्या आगीत किमान ११९ लोकांचे निधन.
२०१३ : चीनमधील जिलिन प्रांतातील पोल्ट्री फार्मला लागलेल्या आगीत किमान ११९ लोकांचे निधन.
२०१२ : राणी एलिझाबेथ (दुसरी) - यांच्या डायमंड ज्युबिलीसाठी थेम्स नदीवर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
२००६ : सर्बिया आणि मॉन्टेनेग्रो यांचे एकत्रीकरण होऊन मॉन्टेनेग्रो हा देश स्वत्रंत झाला.
१९९८ : जर्मनी मधील हायस्पीड रेल्वेचा यांत्रिकी बिघाडामुळे अपघात त्यात १०१ लोकांचे निधन.
१९९१ : माउंट अनझेन - जपानमधील क्युशू येथील ज्वालामुखीचा उद्रेक त्यात ४३ लोकांचे निधन.
१९८० : ग्रँड आयलंड चक्रीवादळ - अमेरिकेतील नेब्रास्का मध्ये झालेल्या चक्रीवादळात ५ लोकांचे निधन तर ३० करोड डॉलर्स चे नुकसान.
१९७३ : सोव्हिएत सुपरसॉनिक तुपोलेव्ह Tu-144 - या सुपरसॉनिक प्रवासी विमानाचा फ्रान्स मध्ये अपघात, यात १४ लोकांचे निधन. हा सुपरसॉनिक प्रवासी विमानाचा पहिला अपघात आहे.
१९६५ : जेमिनी ४ - नासाच्या जेमिनी ४ या अंतराळ मोहिमेचे प्रक्षेपण. याच मोहिमेत एड व्हाईट हे स्पेसवॉक करणारे पहिले अमेरिकन बनले.
१९६२ : एअर फ्रान्स फ्लाइट ००७ - या विमानाचा पॅरिस, ऑर्ली विमानतळावर स्फोट त्यात १३० लोकांचे निधन.
१९४२ : दुसरे महायुद्ध - अलेउशियन बेटांची मोहीम: जपानने उनालास्का बेटावर बॉम्बफेक सुरू केली.
१९४१ : दुसरे महायुद्ध - जर्मनीने ग्रीक देशातील गाव कंडानोस जमीनदोस्त केले आणितिथल्या १८० रहिवाशांची हत्या केली.
१९४० : दुसरे महायुद्ध - लुफ्तवाफेने पॅरिसवर बॉम्बहल्ला केला.
१९३५ : एक हजार बेरोजगार कामगा मालवाहू गाड्यांवर चढले, त्यांनी ओटावा येथे निषेध ट्रेक आंदोलन सुरू केले.
१८१८ : मराठा साम्राज्याचा अस्त, शेवटचा पेशवा बाजीराव मध्यप्रदेशातील असीरगढजवळ ढोलकोट येथे जनरल माल्कम याच्या स्वाधीन झाले.
३ जून जन्म
१८९० : भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक बाबूराव पेंटर यांचा जन्म (मूत्यू: १६ जानेवारी १९५४)
१८६५ : इंग्लंडचा राजा जॉर्ज (पाचवा) यांचा जन्म. (मृत्यू: २० जानेवारी १९३६)
१८९० : चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि चित्रकार बाबूराव पेंटर यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९५४)
१८९० : खान अब्दुल गफार खान तथा सरहद गांधी यांचा जन्म. (मृत्यू: २० जानेवारी १९८८)
१८९२ : लेखिका तसेच बालसाहित्यिका आनंदीबाई शिर्के यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९८६)
१८९५ : चीन, इजिप्त आणि फ्रान्समधील राजदूत के.एम. पण्णीक्कर यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १९६३)
१९२४ : तामिळनाडूचे १५ वे मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचा जन्म.
१९३० : भारतीय पत्रकार आणि राजकारणी जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म.
१९६६ : पाकिस्तानी क्रिकेट कप्तान जलदगती गोलंदाज वासिम अक्रम यांचा जन्म.
१९३६ : तरला दलाल यांचा जन्म (मृत्यू : ६ नोव्हेंबर २०१३)
१९२४ : ऍमवेचे सहसंस्थापक जय व्हॅन ऍन्डेल यांचा जन्म (मृत्यू : ७ डिसेंबर २००४)
१९२४ : तामिळनाडू राज्याचे २रे मुख्यमंत्री आणि तमिळांचे प्रमुख नेते एम. करुणानिधी यांचा जन्म (मृत्यू : ७ ऑगस्ट २०१८)
३ जून मृत्यू
१६५७ : मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ विल्यम हार्वी यांचे निधन. (जन्म: १ एप्रिल १५७८)
१९३२ : उद्योगपती सर दोराबजी टाटा यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १८५९)
१९५६ : स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तानचे संपादक, लेखक व नाटककार वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १८८१)
१९८९ : इराणी धर्मगुरू आणि राजकारणी रुहोलह खोमेनी यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९०२)
१९९० : इंटेल कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक रॉबर्ट नोयिस यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९२७)
१९९७ : चित्रपट व नाट्य अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९१६)
१९७७ : नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश जीवरसायन शास्त्रज्ञ आर्चिबाल्ड विवियन हिल यांचे निधन.
२०१० : मराठी चित्रपटनिर्माते आणि दिग्दर्शक अजय सरपोतदार यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १९५९)
२०१३ : जर्मन-भारतीय तंत्रज्ञ आणि पत्रकार अतुल चिटणीस यांचे निधन. (जन्म: २० फेब्रुवारी १९६२)
२०१४ : भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे तिसरे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९४९)
२०१६ : अमेरिकन बॉक्सर मुहम्मद अली यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १९४२)
२०११ : भारतीय राजकारणी, हरियाणाचे ६वे मुख्यमंत्री भजन लाल यांचे निधन (जन्म: ६ ऑक्टोबर १९३०)
२००२ : अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक मेर्टन मिलर यांचे निधन (जन्म: १६ मे १९२३)
१९७७ : ब्रिटिश जीवरसायन शास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार आर्चिबाल्ड विवियन हिल यांचे निधन
News - todayspecialdays




Petrol Price




