गडचिरोलीत ४–८ मे दरम्यान वादळी हवामानाचा इशारा : गारपीट होण्याची शक्यता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील हवामानात पुढील पाच दिवसांत मोठा बदल होणार असून, ४ ते ८ मे दरम्यान जिल्ह्यावर वादळाचे सावट असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. या काळात बहुतांश तालुक्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ५० ते ६० किमी/तास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने असेही सांगितले की, काही ठिकाणी गारपीट होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि गरज नसल्यास बाहेर न जाण्याचे आवाहन केले आहे.
विशेषतः ४ आणि ५ मे रोजी वादळाचा वेग सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे. ५ मे रोजी जिल्ह्याच्या अनेक भागात २५ ते ३३ मिमी पावसाचा अंदाज असून गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ६ मे रोजीही वादळी पावसाचा इशारा कायम आहे, तर ७ मे रोजी वाऱ्याचा वेग काहीसा कमी (३० ते ४० किमी/तास) होणार असला तरी ८ मेपर्यंत ढगाळ वातावरण कायम राहणार आहे.
तापमानातही लक्षणीय ताह टोण्याचा अंदाज आहे, त्यामुळे नागरिकांनी आपल्या घराची तयारी करण्याचे आणि गरजेपुरतेच बाहेर जाण्याचे निर्देश हवामान विभागाने दिले आहेत.
News - Gadchiroli




Petrol Price




