महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीत नगरोत्थान व दलित वस्ती योजनेअंतर्गत विकासकामांचे भूमिपूजन संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली शहरातील प्रभाग क्रमांक ०२ मधील साई नगर व भातगिरणी परिसरात नगरोत्थान व दलित वस्ती योजनेअंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोरकर आणि बांधकाम सभापती अनिलजी कुंनघाडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

भूमिपूजन समारंभात प्रभाग क्रमांक ०२ चे नगरसेवक व शिक्षण सभापती हर्षल गेडाम, नगरसेविका कोमलताई नैताम तसेच प्रभागातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी या योजनेच्या माध्यमातून परिसरातील जीवनमान सुधारेल आणि सामाजिक तसेच आर्थिक विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

योजनेअंतर्गत साई नगर व भातगिरणी परिसरात रस्ते व नाल्यांचे बांधकाम, पाणी पुरवठा, विजेची सोय तसेच इतर मूलभूत सुविधांचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामांमुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, परिसराचा सर्वांगीण विकास वेगाने घडेल, असे प्रशासनाने सांगितले.

विशेष म्हणजे या विकासकामांमुळे प्रभागातील नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ होईल, तसेच परिसराचा चेहरा बदलून सकारात्मक परिणाम दिसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos