महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली पोलीस दलाची नक्षल विरोधी कारवाई


- नक्षल्यांनी पुरुन ठेवलेले एक १२ बोर रायफल, ०२ स्फोटके व इतर साहित्य हस्तगत करण्यात आले.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : नक्षलवादी शासनविरोधी विविध घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्यांचा वापर करतात व ते साहित्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमिनीमध्ये पुरुन देवतात. अशा पुरुन ठेवलेल्या साहित्यांच्या वापर नक्षलवाद्यांकडुन नक्षल सप्ताह तसेच इतर प्रसंगी केला जातो.

०७ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११:०० ते १२:०० वाजताच्या दरम्यान उपविभाग धानोरा अंतर्गत पोमके गॅरापती हद्दीतील टिपागड जंगल परिसरात मिळालेल्या गोपनिय खबरीच्या आधारे पत्ती पोलीस पार्टी व सिआरपीएफ के जवान नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना जवानांना नुकसान पोहचवण्याच्या उद्देशाने संशयीत ठिकाणी लपवून ठेवलेले नक्षल साहित्य शोधुन काढण्यात पोलीस जवानांना यश आले. मिळुन आलेल्या डंम्पमध्ये १२ बोर रायफल, देशी बनावटीचे ०२ स्फोटके, नक्षल लिखाण साहित्य, बॅनर, शूज च ईतर दैनंदिन वापराचे साहित्य हस्तगत करण्यात आले.

सदर कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अभियान अनूज तारे, अपर पोलीस अधीक्षक प्रशासन कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख अहेरी व उपविभागीय पोलीस अधिकारी धानोरा स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अभियानात सहभागी असलेल्या गॅरापती पोलीस पार्टीच्या जवानांचे पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले आहे. तसेच जिल्हाभरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्याचे सांगितले असून, नक्षलवाद्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जिवन जगण्याचे आवाहन केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos