महत्वाच्या बातम्या

 चामोर्शी तालुक्यात दारूविरोधी कारवाई : १६ हजार रुपयांची दारू जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील पोलिसांनी १३ एप्रिल रोजी चार ठिकाणी छापेमारी करून मोठ्या प्रमाणात दारू जप्त केली. या कारवाईमुळे स्थानिक दारूविक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

कुनघाडा (रै.) येथे जिजाबाई देवाजी दुर्गे (५५) आणि छाया रामचंद्र दुर्गे (४५) यांच्या घरी छापा टाकून अनुक्रमे ५ हजार रुपये आणि ६ हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली. मुरखळा (माल) येथील सुदर्शना गोपाळा संदोकार (३८) यांच्या घरातून ३ हजार ४० रुपयांची देशी दारू पोलिसांनी हस्तगत केली.

जामगिरी येथे चौथी कारवाई केली गेली, जिथे प्रशून जगन्नाथ गेडाम (३२) यांना मोहाची दारू विकत असताना रंगेहाथ पकडले. त्यांच्या घरातून दोन हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली. या सर्व प्रकरणांबाबत चामोर्शी पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.





  Print






News - Gadchiroli




Related Photos