सौर कृषीपंप तक्रारीच्या निवारणासाठी शिबिरांचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : महावितरणच्या भंडारा मंडळांतर्गत कुसुम-बी आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेंतर्गत आतापर्यंत ५७९१ सौर पंप स्थापित करण्यात आले आहेत. या सौर पंपांबाबत असलेल्या तांत्रिक व इतर तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महावितरणमार्फत १५ ते १७ एप्रिलपर्यंत जिल्हाभरात विशेष एक दिवसीय शिबिरांचे आयोजन केले आहे. या मोहिमेमुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना त्यांच्या समस्या एकाच ठिकाणी सोडविण्याची संधी मिळणार आहे.
सौर कृषी पंप कार्यरत नसणे, पूर किंवा माकडांमुळे सोलर पॅनेलचे झालेले नुकसान, पंप चोरीला जाणे, पाणी उपसा यंत्रणेतील बिघाड अथवा संपूर्ण रक्कम भरूनही पंप न मिळणे अशा विविध तक्रारींचे निराकरण केले जाणार आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी संबंधित अधिकृत एजन्सीचे प्रतिनिधी देखील उपस्थित राहणार आहेत.
तसेच १५ एप्रिलला भंडारा (ग्रामीण) व तुमसर उपविभाग कार्यालय, १६ एप्रिलला पवनी, लाखनी व लाखांदूर उपविभाग कार्यालय, १७ एप्रिलला मोहाडी व साकोली उपविभाग कार्यालय येथे शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
शेतकऱ्यांनी पुढीलप्रमाणे कागदपत्रे शिबिरात येताना आणावीत आपला लाभार्थी क्रमांक, ओळखपत्र व आधारकार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. या कागदपत्रांच्या आधारे संबंधित प्रकरणाचा तांत्रिक तपशील तत्काळ तपासला जाणार आहे.
News - Bhandara




Petrol Price




