विभागीय स्तरावरील महिला लोकशाही दिन सोमवारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : विभागीय स्तरावरील महिला लोकशाही दिन विभागीय आयुक्त (महसुल), नागपूर विभाग, नागपूर यांचे कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. मार्च २०२६ विभागीय महिला लोकशाही दिन १३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात येणार आहे.
लोकशाही दिनात तक्रारी स्वीकारण्याचे पुढीलप्रमाणे निकष आहे. अर्ज विहित नमुन्यात असावा. तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरूपावे असावे व तक्रार अर्ज दोन प्रतीत सादर करावा. तक्रार निवेदनावर यापूर्वी झालेल्या जिल्हा स्तरावरील महिला लोकशाही दिन समितीचा कार्यवाही अहवाल जोडणे आवश्यक आहे. जिल्हा स्तरावरील महिला लोकशाही दिनात यापूर्वी दिलेला अर्ज व त्यावर कार्यवाही केलेला अर्ज असावा.
न्यायप्रविष्ट प्रकरणे, विहित नमुण्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेला अर्ज, सेवा विषयक आस्थापना विषयक बाबी, तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे नसेल तर स्वीकारणार नसल्याचे कळविण्यात आले आहे.
समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या तक्रारी तसेच अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पीडित महिलाना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन राज्यस्तरावर, विभागीय स्तरावर, जिल्हास्तरावर व तालूका स्तरावर राबविण्यात येतो.
News - Nagpur




Petrol Price




