गडचिरोली जिल्हा अधिवक्ता संघटनेच्या अध्यक्षपदी ऍड. संजय देशमुख, सचिवपदी ऍड. प्रकाश भोयर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्हा अधिवक्ता संघटनेची निवडणूक आज शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व अधिवक्त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर सायंकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.
या निवडणुकीत अध्यक्षपदी ऍड. संजय देशमुख यांची तर सचिवपदी ऍड. प्रकाश भोयर यांची निवड झाली. तसेच उपाध्यक्षपदी ऍड. उमेश मडावी, सहसचिवपदी ऍड. उमेश कुकुडकर, कोषाध्यक्षपदी ऍड. पल्लवी केदार आणि ग्रंथपालपदी ऍड. पायल धाईत यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्य (महिला राखीव) पदावर ऍड. प्रिया मल्लेलवार यांची निवड झाली. तर सर्वसाधारण कार्यकारिणी सदस्य म्हणून ऍड. जितेश खोब्रागडे, ऍड. हितेश थोटे, ऍड. निलीमा जुमनाके आणि ऍड. गिरीधर बांगरे हे निवडून आले.
नवीन अध्यक्ष आणि सचिव यांनी आपल्या विजयाचे श्रेय वरिष्ठ अधिवक्ता ऍड. प्रमोद धाईत, ऍड. सचिन कुंभारे, ऍड. रवींद्र दोनाडकर, ऍड. नितेश लोडेल्लीवार, ऍड. अनिल चौधरी आणि ऍड. संजय भट्ट यांना दिले. तसेच सर्व अधिवक्त्यांचे सहकार्य व विश्वासामुळे हा विजय शक्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
News - Gadchiroli




Petrol Price




