महत्वाच्या बातम्या

 ट्रकच्या धडकेत दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : दाभा कोथुर्णा मार्गावर ३१ मार्च रोजी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मृतकाची ओळख राकेश पुरुषोत्तम ढंगे (वय ३२, रा. खमाटा टाकळी) अशी झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी ट्रक क्रमांक एमएच ४० सीटी ४२१३ या दुचाकीला धडक दिली. धडकेमुळे राकेश ढंगे गंभीर जखमी झाला आणि तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

घटनास्थळी पोलीस तातडीने पोहोचले आणि पंचनामा करून मृतकाच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला असून तपास सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना मार्गावर सावधगिरी बाळगण्याचे आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos