महत्वाच्या बातम्या

 मध्य-पूर्व युद्धामुळे इंधन तुटवडीची भीती : पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा दिलासा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : मध्य-पूर्वेत अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या तुटवडीची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, पेट्रोलियम मंत्रालयाने या भीतीवर स्पष्टपणे सांगितले की, देशात पुढील दोन महिने पुरेल एवढा इंधन साठा उपलब्ध आहे.

मंत्रालयाच्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या किमती सुमारे ४० टक्क्यांनी वाढल्या असल्या तरी देशांतर्गत ग्राहकांसाठी सिलिंडरच्या किमतीत कोणतीही वाढ केलेली नाही. यामुळे तेल कंपन्यांना काही प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे.

सर्वसामान्यांना दिलासा -
मंत्रालयाच्या माहितीनुसार, ब्रेंट क्रूडचा भाव गेल्या दोन महिन्यांत ७० डॉलर प्रति बॅरलवरून १०० डॉलरच्या वर पोहोचला आहे. मात्र, देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ६ एप्रिल २०२२ पासून स्थिर आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे, तरी आंतरराष्ट्रीय चढ-उतारांचा भार तेल कंपन्यांना सहन करावा लागत आहे.

गॅस व इंधन पुरवठा सुरळीत -
पीएनजी आणि सीएनजीचा १०० टक्के पुरवठा सुनिश्चित करण्यात आला आहे. ९२ टक्के गॅस बुकिंग ऑनलाइन होत असून, ८१ टक्के डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोडद्वारे पूर्ण केली जात आहे. काल एकाच दिवशी ६० लाख सिलिंडर वितरित करण्यात आले, ज्यामुळे देशात इंधन पुरवठ्याची सुरळीतता दर्शवते.

विमान इंधन दर वाढला, तरी प्रवाशांसाठी परवडणारा -

विमान इंधन (ATF) दरात २५ टक्क्यांची वाढ झाली आहे, तरी जागतिक बाजारपेठेच्या तुलनेत ही वाढ फार कमी आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले की, हवाई प्रवास सामान्य नागरिकांसाठी परवडणारा राहावा, ही सरकारची प्राथमिकता आहे.





  Print






News - World




Related Photos