महत्वाच्या बातम्या

 नागपूरसह विदर्भात तापमान शिखरावर : ४०°C पेक्षा जास्त उष्णता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : विदर्भात उन्हाचा प्रचंड तडाखा सुरु आहे. शुक्रवारी नागपूरकरांना या मोसमातील सर्वाधिक उष्णतेचा सामना करावा लागला. शहरात ४०.६°C तापमान नोंदवले गेले असून, हा दिवस आतापर्यंतचा सर्वात हॉट ठरला आहे.

एकीकडे हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे, तर दुसरीकडे नागपूरकरांना उष्णतेच्या झळांमुळे घामाच्या धारांनी अक्षरशः न्हाऊ घातले. केवळ नागपूरच नव्हे, तर विदर्भातील अमरावती, अकोला, वर्धा, चंद्रपूर आणि वाशिम या सहा जिल्ह्यांमध्येही तापमान ४०°C पेक्षा जास्त गेले आहे, ज्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील ६–७ दिवस महत्त्वाचे ठरतील. येत्या आठवड्यात नागपूरसह विदर्भात विचित्र हवामान दिसण्याची शक्यता आहे. कडक उन्हाच्या झळांसोबतच सोसाट्याचा वारा आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी ऊन आणि पाऊस यापासून बचाव करण्याची तयारी ठेवावी, असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos